VIDEO : 'पर्रीकरांच्या मुलावर भाजपच्या दारात भीक मागण्याची वेळ, म्हणून...'; संजय राऊत म्हणाले... - शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपावर आरोप
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मनोहर पर्रीकर हे गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख संस्थापक ( Former Goa Chief Minister Manohar Parrikar) होते. त्यांनी कष्ट केले आहेत. आज त्यांच्या मुलावर ती ही त्यांच्या भाजपच्या दारामध्ये भीक मागायची वेळ यावी अशा प्रकारे भाजपला कन्व्हिन्स करायची वेळ आली आहे तो वैताग घेऊन त्यांनी भाजपचा त्याग केला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut about Utpal Parrikar ) यांनी दिली. उत्पल पर्रीकर यांची वेदना मी समजून घेतो ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला तो पक्ष सोडताना अशा वेदना होतात. त्या मी त्यांच्या चेहऱ्यावरती अनुभवल्या आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहे. भारतीय जनता पार्टीने जी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्या सगळ्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवसेनेने जवळ आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. लक्ष्मीकांत पार्सेकर सारख्या कार्यकर्त्यांनी गोव्यामध्ये भाजपाची बिजे रोवली हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते. आज तेही म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टीला मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून माझी उमेदवारी नाकारली तर हे दुर्दैवी असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सोबत माझी बातचीत झाली होती परंतु गोव्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे समजत नाही परंतु ते आमचं ऐकत नाहीत एवढा कॉन्फिडन्स त्यांना कोठून येत आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले.