रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन याचिकेवर आज निकालाची शक्यता - शौविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या दोघांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होत आहे. रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्या वतीने त्यांचे वकील अॅड. सतीश माने शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात युक्तिवाद करत होते. रिया चक्रवर्तीच्या जामीन याचिकेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून विरोध दर्शवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या संदर्भातला निर्णय राखून ठेवलेला होता. आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात रिया चक्रवर्ती व तिच्या भावाच्या जामीन याचिकेवर निर्णय देणार आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...