...अन्यथा राजकीय संन्यास घेतो; फडणवीसांच्या वक्तव्यावर राजकीय टोलेबाजी सुरू
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'आमच्या हाती सत्ता द्या, मी ओबीसींचे आरक्षण परत आणून दाखवतो आणि जर असं करून नाही दाखवलं, तर राजकीय संन्यास घेतो'! अशी जाहीर ग्वाहीच देऊन टाकली. राजकीय संन्यास घेण्याच्या फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे.