बंगालमध्ये लाखोंच्या सभा तर महाराष्ट्रात कोरोनाची भीती का, ज्येष्ठांचा सवाल - मुंबई लॉकडाऊन बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शासनाने राज्यासह जिल्ह्यामध्ये गतवर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर केली होते. याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षापासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांचे मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'च्या वतीने करण्यात आला आहे.