समीर वानखेडे यांनी पदाचा गैरवापर केला हे सिद्ध झाले, नाना पटोले यांचे टीकास्त्र - नाना पटोले+समीर वानखेडे
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - नवाब मलिक असोत, समीर वानखेडे असोत. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाहीत, पदाचा दुरुपयोग कोण करत असेल तर त्याला आज ना उद्या परिणाम भोगावे लागतील. समीर वानखेडे यांनी पदाचा गैरवापर केला हे आज सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज चिपळूण येथे केले आहे. ते म्हणाले, की देशात ड्रग्स आणणारा पहिला दोषी, त्याचा मुद्दा काँग्रेस सातत्याने उचलून धरत आहेत. खरेतर कोंबडे मोठे की अंडे मोठे, सातत्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही मुळावर जात आहोत, असे ते म्हणाले.