Kolhapur Drone Footage- पुराने कोल्हापुरची अशी झाली वाताहात, आकाशातून बघा सद्यस्थिती - कोल्हापूर पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12556071-150-12556071-1627101580939.jpg)
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. पाण्याची पातळी सुद्धा कमी होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री पाण्याची पातळी जवळपास 56 फूटांवर पोहोचली होती. मात्र, सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 55.7 फुटांवर आली आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध पूरबाधित गावांमधील पाण्याची पातळी सुद्धा एक फुटाने कमी झाली आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे विस्कटलेले जनजीवन आता पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. जिल्ह्यातील 108 बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापूर शहरात ज्या ठिकाणी पुराचा फटका बसलेल्या भागाची दृश्ये टिपली आहेत तौफिक मीरशिकारी....
Last Updated : Jul 24, 2021, 12:12 PM IST