अर्थसंकल्प शेतकरी आत्महत्या थांबवणारा नाही - रघुनाथ पाटील - News about the budget
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. असे मत व्यक्त करत 50 हजार प्रोत्साहन निधींने काही उपयोग होणार नाही. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी करत घटलेल्या विकास दराच्या दबावाखाली भीत-भीत अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे.
सरकारने रिंग रोड आणि नवीन विमानतळ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, रिंग रोड आणि विमानतळामुळे कोणी आत्महत्या केलेली नाही. शेतकरी आत्महत्या होत असताना, त्याचा विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे या अर्थसंकल्पात 2 लाख पुढील कर्जमाफी होणे अपेक्षित होते. असे मतही पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.