VIDEO : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी बनवल्या जातो बांबूंपासून QR Code
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - दहा बाय तेराच्या अडगळीच्या खोलीतील तिचे जग. आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याच खोलीत संसार आणि व्यवसाय चालविण्यासाठीची तारेवरची कसरत. मात्र, दृढ इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की संकटं आणि आव्हानांचे आभाळ देखील ठेंगणे होत जाते. बांबूवर क्यूआर कोड (Bambu QR Code) विकसित करणारी एकमेव भारतीय महिला मीनाक्षी वाळके (Minakshi Walke) यांच्या या असामान्य प्रवासाच्या यशाचे हे आत्तापर्यंतचे टोक जरी असले, तरी त्यांची ओळख केवळ इथवर सिमीत नाही. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या हस्तकलेची ख्याती आता सातासमुद्रापार गेली आहे.