पुणे : माळरानाला लागलेल्या वनव्यामुळे गाड्यांच्या यार्डलाही लागली आग - गाड्यांच्या यार्डलाही लागली आग
🎬 Watch Now: Feature Video
चाकण (पुणे) - चाकणमधील माळरानाला लागलेल्या वनव्यामुळे गाड्यांच्या यार्डला आग लागली आहे. या आगीत चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाकी येथील TATA DLT कंपनीच्या कंन्टेनर गाडी यार्डही या आगीत आल्या माहिती आहे. यात तब्बल २० पेक्षा जास्त कन्टेनर जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अग्निशामन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.