बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे कामदेखील ठप्प झाले होते, तोदेखील सायबर हल्ला होता का? - पृथ्वीराज चव्हाण - Prithviraj Chavan reaction on cyber attack
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 12 ऑक्टोबरला संपूर्ण मुंबईची वीज अचानक गेली होती. मात्र, ती वीज विदेशी सायबर हल्ल्यामुळे गेली असल्याची शंका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. हा हल्ला फक्त मुंबईसाठीच नाही तर राज्यासाठी चिंताजनक असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे कामदेखील काही तासांसाठी ठप्प झाले होते. तोदेखील सायबर हल्ला होता का? किंवा सध्या कोरोनाची लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटवर देखील सायबर हल्ला होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली जाते. त्यामुळे आपण डिजिटायझेशनकडे वळत असलो तरी अशा हल्ल्यांसाठी तयार आहोत का? देशाची सायबर सुरक्षा कवच चोख आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Mar 2, 2021, 4:17 PM IST