MH Primary School Opening : प्राथमिक शाळेत किलबिलाट सुरू, विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत - MH Primary School Opening
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. तेव्हापासून शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थांची किलबिलाट बंद होती. पहिली लाट ओसरल्यानंतर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवनी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर आठवीचे वर्ग सुरू होत नाही, तोच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. यावर्षी कोरोना नियंत्रणात आल्याने 25 जुलैपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंदच होते. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून पहिली ते चौथीच्या शाळेची पहिली घंटा वाजली आहे. ग्रामीण भागात सर्वत्र प्राथमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी शहरी भागातील शाळा पूर्णत सुरू झालेल्या नाहीत.
Last Updated : Dec 1, 2021, 8:02 PM IST