सुक्या मेव्याच्या दरात वाढ, विक्रीवर परिणाम नाही
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - दिवाळीच्या सणात सुकामेव्याला मोठी मागणी असते. दिवाळीला अनेकजण भेटवस्तू म्हणून सुकामेवा देत असतात. दरम्यान, टाळेबंदी व महागाईमुळे यावर्षीही सुक्या मेव्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. दर वाढले असले तरी बाजारात मात्र ग्राहकांची पसंती सुक्या मेव्याला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या तोंडावर काजू, बदाम, अंजीर, अक्रोड आदी सुक्या मेव्याच्या पदार्थांच्या भावात वाढ होते. कारण या दरम्यान विविध प्रकारच्या मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दिवाळी निमित्त नागरीक ऐकमेकांना मोठ्या प्रमाणात मिठाईसह सुक्या मेव्याचे बॉक्स भेट म्हणून देतात. यावर्षी दर वाढले आहे पण, ग्राहकांकडून होणार मागणी कमी झालेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.