'नाही तं वं आज माहेरास येणारंच नाही' विठ्ठल वाघांच्या कवितेने रानभाजी महोत्सव 'चवदार' - ranbhaji mahotsav in akola
🎬 Watch Now: Feature Video

अकोला : प्रसिद्ध वऱ्हाडी कवी तथा माजी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी अकोल्यात पार पडलेल्या रानभाजी महोत्सवादरम्यान चारोळीतून रानभाजीचे महत्व पटवून दिले. 'माझी प्रकृती टवटवीत ताजी, त्याचं कारण रानभाजी' अशी चारोळी सादर करतानाच 'नाही तं वं आज माहेरास येणारच नाही' ही कविताही सादर केली. त्यांच्या या कवितेने महोत्सवात काही वेळ वातावरण भावूक झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, कृषी विभागाच्या आत्मा या शाखेतर्फे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन विठ्ठल वाघ यांच्या हस्ते पार पडले. याशिवाय जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रकल्प संचालक डॉ. कांताप्पा खोत, अकोला तालुका कृषी अधिकारी श्री. प्रधान यांचीही यावेळी उपस्थिती होती.