जनता कर्फ्यू : भंडाऱ्यात प्रतिसाद, रस्ते निर्मनुष्य - coronavirus updates
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील संपूर्ण रस्ते निर्मनुष्य झाले असून काही तुरळक लोकं सोडल्यास सर्वत्र या जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग हे सुद्धा शांत दिसले. गांधी चौक, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, जिल्हाधिकारी चौक, मिस्किल टँक गार्डन, खात रोड, बस स्थानक, पोस्ट ऑफिस चौक, मुख्य बाजारपेठ आणि विविध कॉलनीमधील रस्ते सर्वच निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यांवर मोठी ट्रक आणि काही चारचाकी व्यतिरिक्त टू व्हीलरने फिरणारी अतिउत्साही तरुण मंडळी दिसली. मात्र, त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत होती. एकंदरितच लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घरीच राहणे पसंत केल्याचे चित्र आहे.