'जनता कर्फ्यू'ला गोंदियाकरांचा प्रतिसाद, रेल्वे स्थानकावरही शुकशुकाट - janta curfew news gondia
🎬 Watch Now: Feature Video
गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला गोंदियाच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज (रविवार) सकाळी गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळाला. गोंदिया रेल्वे स्थानक हे मुंबई-हावडा मार्गावर आहे. या रेल्वे स्थानकावर चारही दिशेने रेल्वे जात असल्याने दररोज दोनशेच्यावर रेल्वे गाड्यांची ये-जा असते. तर, जवळपास ३५ ते ४० हजार प्रवाशी रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र आज 'जनता कर्फ्यू'चा प्रभाव या स्थानकावर दिसून येत आहे.