प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या मंदिरात 'तिरंगी' सजावट - प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात सजावट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

पंढरपूर (सोलापूर) - देशभरात आज 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, अखंड वारकरी संप्रदायाचे दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती, स्प्रिंगर, कार्नेशियन अशा विविध फुलांचा यात वापर करण्यात आला. या सजावटीत 146 किलो फुलांचा वापर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.