Video : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसर सप्तरंगी उजेडात निघाला उजळून - शासकीय महापूजा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 14, 2021, 9:40 AM IST

पंढरपूर - विठुरायाची कार्तिकी यात्रा दोन वर्षांनी भरत आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी विविध रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे श्री विठ्ठल-रक्मिणी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी पश्चिम द्वार रुक्मिणी द्वार महाद्वार श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप व तुकाराम भवन या ठिकाणी एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर सप्तरंगी उजेडात उजळून निघाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा 15 नोव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास पार पडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.