यवतमाळ : उमरखेडमध्ये बस पाण्यात बुडाल्याच्या घटनेवर मंडळ अधिकाऱ्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - उमरखेड एसटी बस बुडाली
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - उमरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. या बसमध्ये 4 प्रवाशी आणि चालक व वाहक असे 6 प्रवासी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती. दरम्यान, या घटनेत एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून त्याला उमरखेडच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच बेपत्ता असलेल्या तिघांनी वाचवण्यात यश आले आहे.