मुंबई - 'रोडीज डबल क्रॉस' या अॅडव्हेंचर रिअॅलिटी शोचे गँग बॉस प्रिन्स नरुला आणि त्यांची पत्नी युविका चौधरीबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. या दोघांवरही लाचखोरीचा आरोप लावण्यात आला आहे. 'रोडीज' शोमधील एका स्पर्धकानं असा दावा केला की, प्रिन्स नरुलानं शोमध्ये त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी त्याला 20 लाख रुपयांची लाच मागितली. शोमध्ये हा आरोप झाल्यानंतर प्रिन्सनं आपला राग गमावला. यावर त्यानं आपली नाराजी व्यक्त केली. त्यानं या स्पर्धकाच्या आरोपाचे खंडन केले आहे. या शोमध्ये प्रिन्सवर हा आरोप झाल्यानंतर खूप गोंधळ निर्माण झाला.
प्रिन्स नरुला आणि त्याच्या पत्नीवर आरोप : शोमधील होस्ट रणविजय सिंगनं एका स्पर्धकाची फाईल उघडली, यानंतर काही गोष्टी या उघडकीस आल्या. फाईलमध्ये स्पर्धकानं प्रिन्सवर 'रोडीज'मध्ये त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी पैसे मागितल्याचा दावा केला होता. या स्पर्धकांच्या आरोपामुळे तिथेल असणाऱ्या जजला धक्का बसला. या गोष्टीवर प्रिन्सला देखील राग आला. आता या शोमधील एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एक स्पर्धक ऑडिशनसाठी उभा असल्याचा दिसत आहे. यानंतर तो दावा करतो की, 'रोडीज'मध्ये येण्यासाठी प्रिन्सशी संपर्क साधण्यासाठी ते त्याची पत्नी युविका चौधरीशी बोलले होते. यानंतर युविकाचं नाव समोर आल्यानंतर प्रिन्स संतापला.
No one saw this coming! 🤯 Iss kahani mein kitna sach hai? Watch the episode to find out! 😲💥
— MTV India (@MTVIndia) February 16, 2025
Watch the entire episode only on JioHotstar!#HeroKarizma MTV Roadies Double Cross Co-powered by #AvvatarSportsNutrition and #POCOX7, every Sat - Sun 7PM on @MTVIndia and start… pic.twitter.com/5ekupQjX9R
Hesitation has left the chat! 🤯 No filters bas full on tamasha hoga! 🙌🏻💯#HeroKarizma MTV Roadies Double Cross Co-powered by #AvvatarSportsNutrition and #POCOX7, every Sat-Sun at 7 PM only on @MTVIndia and @JioHotstar. #Roadies #MTVRoadies #MTVIndia #MTVRoadiesXX… pic.twitter.com/yrB2pjW2hk
— MTV India (@MTVIndia) February 14, 2025
'रोडीज डबल क्रॉस'चा प्रोमो व्हायरल : प्रिन्स नरुलानं स्वतःचा बचाव करत यावर म्हटलं, "माझा भाऊ गेल्या 5 वर्षांपासून ऑडिशनसाठी येत आहे. अखेर गेल्या वर्षीपासून त्यानं येणं बंद केलं. कारण, तो ते करू शकला नाही. माझा भाऊ येत असल्याचं मी इथे कोणालाही सांगितलं नव्हतं. मी माझ्या भावला म्हटलं होत की, तुझ्यात जर ताकत असेल तर तू ये. मी कधीच कोणाबद्दल शिफारस करत नाही." यानंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक स्पर्धक म्हणते, "मला वाटलं की, 'रोडीज'मध्ये येण्यासाठी पैसे लागते." यावर प्रिन्स चिडून म्हणतो, "तुला वाटते की, आम्ही लाच घेणारे आहोत. हे बघ, जर ते माझ्यापर्यंत पोहोचले असते तर मी काहीही बोललो नसतो. मात्र आता तुम्ही माझ्या पत्नीचं नाव घेतलं आहेस." या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन प्रिन्सला पाठिंबा देत आहेत.