नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गंगाष्टक रुपात करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा - नवरात्रौत्सव २०१९ कोल्हापूर
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली आहे. ९ दिवस ९ वेगवेगळ्या रुपात अंबाबाईची पूजा बांधण्यात येत असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली आहे. आद्य शंकराचार्य काशीमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी गंगेचे अष्ट त्यांनी रचले असावे असे सांगितले जाते. गंगा नदीचे भारताच्या धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळेच आज करवीर निवासिनी अंबाबाईची गंगाष्टक रुपामध्ये पूजा बांधण्यात आली आहे.
गंगेच्या मूर्तीमध्ये तिच्या हातात अखंड जीवन प्रवाहाचे अमृताचे प्रतिक म्हणून मंगलकलश असतो आणि ज्ञानाचे, पवित्रतेचे प्रतीक म्हणून कमळ असते. अगदी त्याच पद्धतीने आज अंबाबाईची पूजा बांधण्यात आली आहे. देवीची दुसऱया दिवशीची पूजा रामप्रसाद ठाणेकर, श्रीनिवास जोशी आणि योगेश जोशी यांनी बांधली आहे. तर, देवीच्या दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीसुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.