Republic Day In Kolhapur : पालकमंत्री सतेज पाटलांचा अनोखा उपक्रम, स्वातंत्र्यसैनिकांच्या घराबाहेर लावणार नामफलक - जिल्हाधिकारी राहुल रेखावर
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर: कोल्हापुरात आज प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात ( Republic Day Ceremony Kolhapur ) आला. शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयात सकाळी ध्वजारोहण पार पडले. तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील ( Gaurdian Minister Satej Patil ) यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शाहू स्टेडियम ( Chhatrapati Shahu Stadium Kolhapur ) इथं ध्वजारोहण करण्यात ( Flag Hosting Ceremony Kolhapur ) आले. कोरोना संसर्गामुळे यावेळेस देखील ठराविक अधिकाऱ्यांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हे समारंभ पार पडले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली आणि जनतेस संबोधन केले. यावेळी शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ( Covid Third Wave ) सामोरे जात असताना प्रशासन सज्ज असल्याचं म्हटलं आहे. तसेच गेल्या वर्षभरात महापूर आणि कोरोना या दोन्हीचा सामना करताना करण्यात आलेल्या उपाय योजना याबाबत माहिती दिली. दरम्यान, महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर (IAS Rahul Rekhavar ) , महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे ( IAS Kadambari Balkawade ) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत. सैनिक म्हणजे देशाचा अभिमान आहे. आणि यांचा मान ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे म्हणत. जिल्ह्यातील तब्बल 350 स्वातंत्र्यसैनिकांच्या घराबाहेर नामफलक लावणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे छत्रपती शाहू स्टेडियममध्ये ठराविक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना उपस्थित न रहाता आल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील आणि स्वतः सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच स्वांत्र्याचे शिलेदार म्हणत त्यांचा सन्मान म्हणून स्वातंत्र्य सैनिक गोविंद जोशी यांच्या घराबाहेरील नाम फलकाचे अनावरण केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व गोविंद जोशी यांच्या घरचे उपस्थित होते. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.