Pune Metro : मेट्रोकडून नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे काम, दोषींवर कारवाईची मागणी - खासदार वंदना चव्हाण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्याच्या विकासासाठी मेट्रो ( Pune Metro ) महत्त्वाची आहे. मात्र, या मेट्रोने पुण्याच्या निसर्गाची हानी करण्याचा चंग बांधला का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. मेट्रोच्या कामांमध्ये जो काही राडारोडा तयार होतो, तो राडारोड मेट्रोकडून नदीपात्रात टाकला जात आहे. आधीच हरित लवादाकडे मेट्रोमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानी संदर्भात केसेस सुरू आहे. तरीही मेट्रोकडून अशी मनमानी केली जात आहे. मेट्रो अंडर ग्राउंड करण्यासाठी जो मातीचा राडा काढला जातो. तो म्हात्रे पुलाच्या नदीपात्राच्या ब्ल्यू लाईनमध्ये टाकल्या जात आहेत. मेट्रोच्या या प्रकारामुळे पुराचा धोका वाढवला आहे. ही बाब पर्यावरणवादी सारंग यांनी निदर्शनास आणली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण ( MP Vandana Chavan ) यांनी कामाचा विरोध करत हे काम तत्काळ थांबावे व दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.