सरसंघचालक मोहन भागवतांच्या 'त्या' विधानावर केंद्र सरकारने विचार करावा - खासदार संजय राऊत - मुंबई संजय राऊत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - जोवर आपण चीनवर अवलंबून आहोत, तोवर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागणार. अफगाणिस्तानातील तालिबानी राजचे समर्थन हे सर्वात आधी चीनने केले आहे. चीन आजवर आपल्यासाठी डोकेदुखी बनून राहिला आहे. आजही आपले आर्थिक व्यवहार हे चीनवर अवलंबून आहे. चीनची आर्थिक परिस्थिती आपल्यावर अवलंबून आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यावर सरकारने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. यासह खासदार संजय राऊतांनी विविध मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.