Amravati Violence : संजय राऊतांनी अमरावती हिंसाचाराबद्दल बोलू नये - नवनीत राणा - संजय राऊतांनी अमरावती हिंसाचाराबद्दल बोलू नये
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - शहरात झालेल्या हिंसाचारानंतर (Amravati Violence) त्यानंतर अमरावती सह ग्रामीण भागात संचारबंदी लावण्यात आली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी रस्त्यावर गेल्या 24 तासांपासून पोलीस कार्यरत आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी अमरावती शहरातील चित्रा चौक, इतवारा, पठाण चौकसह विविध भागाची पाहणी केली. या दरम्यान नवनीत राणा यांनी अमरावती हिंसाचाराबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये, अशी टीका केली आहे. शिवाय यावेळी राणा यांनी पोलिसांशी संवादही साधला.