'चीनच्या तुलनेत आपण लष्करी बळ अधिक वाढवणे गरजेचे' - सरसंघचालक मोहन भागवत
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज नागपूरमध्ये पार पडला. हेडगेवार स्मृती सभागृहात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक कोरोना, चीन आणि हिंदुत्त्व अशा विविध विषयांवर बोलले. चीनच्या तुलनेत आपण आपले लष्करी बळ अधिक वाढवणे गरजेचे आहे. भारत शेजारील सर्व देशांशी मित्रता राखण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपल्या या पवित्र्याला चीनसारखे देश आपली कमजोरी समजत असतील तर ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले.