Congress Protest Nagpur : आमदार ठाकरेंचा इशारा.. म्हणाले, 'महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही' - काँग्रेसचे पंत्रप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचा ( PM Modi Statement Against Congress ) निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभरात आंदोलन सुरू ( Congress Protest Against PM Modi ) केले. नागपूरच्या संविधान चौकात आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात ( Congress Protest Nagpur ) आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. एकीकडे महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी दुसरीकडे पुरुष कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. तर काही कार्यकर्ते वेगवेगळे होऊन गटागटाने नारेबाजी करताना दिसले.