BJP MLAs Suspension Quashes : न्यायालयाच्या निकालाने ठाकरे सरकारला चांगली अद्दल घडली : आमदार रवी राणा - भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : गेल्या वर्षी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले ( 12 BJP MLAs Suspended ) होते. तर आज सुप्रीम कोर्टाने सर्व बाराही आमदारांचं निलंबन रद्द ( BJP MLAs Suspension Quashes ) केलं. यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली ( MLA Ravi Rana Criticized Thackeray Government ) आहे. ठाकरे सरकारने १२ आमदारांचं निलंबन करून लोकशाहीची हत्या केली होती. १२ आमदार व त्यांच्या मतदार संघावर अन्याय केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो, लोकशाहीला पोषक आहे. वारंवार ठाकरे सरकार चुका करत आहे. सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारवर ओढलेले ताशेरे हे महाराष्ट्रचे दुर्भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.