राज्यमंत्री बच्चू कडूंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी - बच्चू कडूंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी
🎬 Watch Now: Feature Video
राजकारणात कधी विरोधकांवर तर कधी कामचुकार अधिकाऱ्यांवर फटकेबाजी करणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आता क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली आहे. अमरावतीच्या अचलपूर येथे क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः क्रिकेट मैदानात हातात बॅट घेत जोरदार फटकेबाजी केली आहे. बच्चू कडू हे नेहमीच चर्चेत असतात. राजकारणात विरोधकांवर फटकेबाजी करताना कडू हे नेहमी दिसतात. मात्र खेळातही तेअग्रेसर असतात. काही दिवसांपूर्वी कबड्डीच्या मैदानात खेळताना दिसलेले बच्चू कडू आता क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटके बाजी करताना दिसले आहे.