Mimicry artist Praveen Potdar on Latadidi : लता मंगेशकरांच्या आवाजाने मला वेगळी ओळख दिली - मिमिक्री आर्टिस्ट प्रवीण पोतदार - मिमिक्री आर्टिस्ट प्रवीण पोतदार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 6, 2022, 10:39 PM IST

नाशिक - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 6 दशके आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांची कारकीर्द प्रचंड मोठी आहे. लता दीदी यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. ( Lata Mangeshkar Passed Away ) नाशिकचे कलाकार प्रवीण पोतदार ( Mimicry Artist on Praveen Potdar ) गेल्या 40 वर्षांपासून निवेदन, मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. 100 हुन अधिक कलाकारांचे, राजकारण्यांचे ते हुबेहूब आवाज काढतात. मात्र, त्यांच्या या प्रवासात त्यांना लता मंगेशकर यांच्या आवाजाने एक वेगळी ओळख करून दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीण पोतदार यांनी देशविदेशात एक हजारहुन अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. मात्र, प्रत्येक कार्यक्रमात ते सादर करत असलेल्या लतादीदींच्या आवाजाला प्रेक्षकांची दाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ( Mimicry artist Praveen Potdar on Latadidi ) पोतदार यांनी लतादीदीं सोबतच्या भेटीच्या अनुभव सांगून त्यांच्याबद्दल आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.