VIDEO : पुण्यात सलून असोसिएशनच्या वतीने नाना पटोलेंच्या प्रतिमेला 'दुधाचा अभिषेक' - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुधाचा अभिषेक
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गेल्या आठवड्यात 'आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो' असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे प्रतिसाद पाहायला मिळाले. त्यानंतर काल पुन्हा नाना पटोले यांनी नाशिक येथे बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला असून या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नानाच्या समर्थनात पुण्यात आज (सोमवारी) सलून असोसिएशनच्या वतीने नाना पटोले यांच्या समर्थनात पटोलेंच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करण्यात आला आहे. भाजपाने नाना पटोले यांची प्रतिमा मलिन करू नये, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.