Makarsankranti Special : मकरसंक्रांतीच्या आसपास घडणार मोठे ग्रहमान बदल; काय होणार परिणाम? जाणून घ्या - ज्योतिष अभ्यासक उदयराज साने
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14179995-thumbnail-3x2-graha.jpg)
पुणे - मकरसंक्रांतीच्या आसपास मोठे ग्रहमान बदल घडणार आहे. यामध्ये रेल्वे अपघात, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. असे भाकीत ज्योतिष अभ्यासक उदयराज साने यांनी केले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्लूटो या धीम्या ग्रहाच्या सोबत इतर ग्रहांच्या युती होणार आहेत. त्यामुळे या युतीचे परिणाम दीर्घकाळ असणार आहेत. रवि-शनी युती की जीवनात प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणारी युती आहे. त्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणात असणार आहे. तीस वर्षानंतर या दोन्ही ग्रहांची युती होणार असल्यामुळे त्यातून घडणारे परिणाम बघणे औत्सुक्याचे ठरेल.