झिरपूरवाडीत तलावाचा बांध फुटल्याने पिकांचे मोठे नुकसान - झिरपुरवाडी तलाव बांध फुटला
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13163189-239-13163189-1632495905108.jpg)
यवतमाळ - दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी येथील तलावाचा बांध फुटल्याने 15 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली आहे. शिवानी-झिरपूरवाडी जवळ हा मातीचा तलाव आहे. मागील दोन दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे हा तलाव पूर्णपणे भरला गेला. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण दिग्रस तालुक्यात पावसाची कमी-अधिक रिपरिप सुरू होती. यामुळे तालुक्यातील झिरपूरवाडी गावा जवळ असणाऱ्या तलावाची भिंत फुटून आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. घटनास्थळी महसूल विभागाच्या पथकाकडून पंचनामा करण्यात आला आहे.