विधानपरिषद निवडणूक रणधुमाळी.. भाजप म्हणते विजयाची नांदी तर विरोधकांचा घोडेबाजाराचा आरोप, पाहा विशेष रिपोर्ट - विधानपरिषद निवडणुकीत भारत विजयी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13907922-thumbnail-3x2-bjp.jpg)
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सहापैकी चार जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या तर दोन जागांवर झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला मतदारांनी मोठा झटका दिला आहे. विदर्भातील नागपूर आणि अकोला विधान परिषद जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून आले आहे. यात आचारसंहिता भंग झाल्याचेही अनेक आरोप झाले. महाआघाडीच्या मतदारांनीही भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. आपल्या विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. -अकोला मतदारसंघात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी 110 मतांनी विजय मिळवून सलग तीन वेळा आमदार राहिलेलेल्या शिवसेनेच्या गोपी किशन बाजोरिया यांना पराभूत करत 'जाइंट किलर' बनले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची हा विजय म्हणजे भविष्यातील भाजपच्या विजयाची नांदी असल्याचे म्हटले आहे.