VIDEO : केंद्राकडून पेट्रोल, डिझेल दरकपात.. ऐन दिवाळीत पेट्रोलपंप चालकांचं निघालं दिवाळं, दोन लाखांपासून 25 लाखांपर्यंत नुकसान
🎬 Watch Now: Feature Video
पेट्रोल आणि डिझेलवरचे उत्पादन शुल्क कमी करायचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. उत्पादन शुल्क कमी झाल्याने पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र यामुळे पेट्रोलपंप चालकांचे मात्र दिवाळे निघाले आहे. प्रत्येक पेट्रोलपंप चालकाला याचा फटका बसला आहे. अचानक उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णय़ाने राज्यातील छोट्या पेट्रोल पंप चालकाचे दीड ते दोन लाख तर मोठ्या पेट्रोल पंप चालकांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकार राज्यात इंधनाचे दर कमी करू शकते, पण ते कमी करण्याआधी त्याची डेडलाईन ठरवून द्यावी म्हणजे पेट्रोल पंप चालकांना तोटा कमी होईल असं मत देखील उदय लोध यांनी नोंदवले आहे. दरम्यान या सर्व परिस्थिती संदर्भात उदय लोध यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..