Lina Nair : कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतलेल्या लीना नायर यांची बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओपदी निवड; सर्वचस्तरातून अभिनंदन - कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतलेल्या लीना नायर
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर - मूळच्या भारताच्या असणाऱ्या 52 वर्षीय लिना नायर या फ्रान्समधील लक्झरी ग्रुप शनैलच्या जागतिक सीईओ बनल्या आहेत. लीना यांनी कोल्हापूरातील 'होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल'मध्ये ( Kolhapur cross convent high school ) आपले शालेय शिक्षण ( Lina Nair Education in Kolhapur ) पूर्ण केले आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यांचे सर्वचस्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील ( Guardian Minister Satej Patil praised Lina Nair ) यांनीही त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.