thumbnail

By

Published : Apr 14, 2021, 1:30 PM IST

ETV Bharat / Videos

आंबेडकर जयंतीनिमित्त राजगृहाला विद्युत रोषणाई

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रत्येकजणच ही जयंती आपापल्या घरीच साजरी करतोय. दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह'ला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी बाबासाहेबांचे अनुयायी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात राजगृहात दर्शनासाठी येत असतात. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनुयायांना दर्शनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीने फुलणारा हा परिसर आज ओस पडला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.