VIDEO : इगतपुरीच्या नागरी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार - leopard spotted at igatpuri of nashik
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरातील चर्च हिल, कॉन्व्हेंट हायस्कूल परिसरात बऱ्याच दिवसांपासून परिसरातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. ह्या परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमालीची घटली आहे. या परिसरात शाळाही असून नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.