Leopard Death : सावरगावतळमध्ये 60 फुट खोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू - 60 फुट विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील एका 60 फुट खोल विहिरीत पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (आज) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सावरगावतळ येथील प्रकाश कारभारी नेहे यांच्या शेतात 60 फुट खोल विहिरी आहे. गुरूवारी सकाळी त्यांचा मुलगा विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विहिरीत मृत बिबट्या आढळून आला. ही माहिती त्यांनी गावचे पोलीस पाटीलसह ग्रामस्थांना दिली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले.