'हे तर मोदींचे देशद्रोही कृत्य!'; उपराकार लक्ष्मण माने यांनी नोंदवला निषेध - लक्ष्मण माने नरेंद्र मोदी टीका
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत जाऊन राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. कोणत्याही पंतप्रधानाने असे करणे हा सरळ देशद्रोह आहे. अयोध्या ही सम्राट अशोकाची साकेत नगरी आहे. अयोध्येत राम अस्तित्वात होता याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्या जागेवर बौद्धमूर्ती, बौद्धांचे स्तूप, बोधचिन्ह, अशोकस्तंभ, अशोकचक्र अशा बौद्धकालीन वस्तू सापडल्या आहेत. तेथे राम मंदिर बांधण्यास माजी आमदार लक्ष्मण माने यांनी विरोध दर्शवला आहे. पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आजपासून तीन दिवस लक्ष्मण माने स्वतःच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत निषेध नोंदवत आहेत.