कोविड रूग्णांच्या सेवेसाठी उपजिल्हाधिकारी झाले गायक - beed live news
🎬 Watch Now: Feature Video
बीड - केज तालुक्यातील बनसारोळा कोविड केअर सेंटर रूग्णांच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध गायक कलावंत प्रकाश बोरगावकर प्रस्तुत ऑक्सिगान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. 7 मे रोजी सायंकाळी 8 वाजता करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी स्वत: गाणे गात, उपस्थितांची मने जिंकली. आणि कोरोना रुग्णांना मानसिक पाठबळ दिले.
अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके हे गेल्या वर्षभरापासुन कोविड रूग्णांच्या सेवेसाठी मोठ्या हिकमतीने काम करत आहेत. कारण अंबाजोगाई तालुक्यामध्ये किंवा विभागामध्ये कुठलीही समस्या उद्भवली तर त्या समस्येचे निराकरण करणे आणि तात्काळ व्यवस्था करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अंबाजोगाई उपविभागाचे पालक म्हणून त्यांच्यावर खुप मोठी जबाबदारी असतानाही त्यांनी समाजासाठी व कोविड रूग्णांसाठी ज्या संस्था व जी माणंस काम करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी ते सतत पुढं असतात. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी झाडके बनसारोळा येथे उपस्थित होते.
महाविद्यालयीन जीवनातील कलावंत जागा
उपस्थितांची गाणे मनमुराद ऐकल्यानंतर त्यांच्यातील कलावंत सुद्धा जागा झाला. आणि त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या करत स्वतः देखील गाणी गायली. ज्यामध्ये सुधीर फडके यांचे विठु माऊली तू माऊली जगाची व स्व. किशोर कुमार यांचे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाडके यांच्यामधील महाविद्यालयीन जीवनातील कलावंत दिसून आला. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब अंबाजोगाई, मानवलोक अंबाजोगाई, आरोग्य विभाग बीड, स्व.नारायणदादा काळदाते प्रतिष्ठाण अंबाजोगाई व महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले होते.