Kolhapur Flood: पूरग्रस्त व्यवसायिकांची एकच मागणी, सरकारने मदत करावी - पुराचे परिणाम
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत चालली आहे. शहरातील काही ठिकाणी शिरलेले पाणी सुद्धा कमी होत आहे तर काही ठिकाणी पाणी पूर्णपणे उतरले आहे. शहरातल्या दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर मार्गावर अजूनही जवळपास 2 फूट पाणी आहे. या मार्गावर असलेल्या व्यावसायिकांना 2019 च्या महापुरात सुद्धा मोठा फटका बसला होता आणि आता यावर्षी सुद्धा मोठा फटका बसला आहे. आधीच्या महापुरातून सावरता सावरता आता पुन्हा एकदा संकट आल्याने अनेकांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. सद्या हे व्यापारी या ठिकाणी असलेले पाणी कमी होण्याची वाट पाहत असून शासनाने सुद्धा आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी मदत जाहीर करावी अशी विनंती ते करत आहेत. एकूणच या भागातील सद्यस्थितीचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतला आहे.