VIDEO : अखेर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लसीकरणासाठी केले आवाहन - इंदुरीकर महाराज
🎬 Watch Now: Feature Video
जालना - कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Kirtankar Nivruti Maharaj Indurikar) यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या, असे आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे. जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. इंदुरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोना तणावमुक्त करा, असे आवाहन करत त्यांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केली. तर यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांचे कौतुकही केले आहे. दरम्यान इंदुरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.