जनतेचा जनतेसाठी 'जनता कर्फ्यू'; यवतमाळकरांची पूर्ण साथ - यवतमाळ कोरोना
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनानुसार सकाळपासून 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद मिळत आहे. जनतेने जनतेसाठी पुकारलेला कर्फ्यू आहे, त्याला यवतमाळकरांची साथ मिळत आहे.
यवतमाळ येथील सतत ग्राहकांची गर्दी असलेले इंदिरा मार्केट, पचकांदिल चौक, बसस्थानक, दर्डा नगर, कॉटन मार्केट, आर्णी रोड, कळंब चौक, दत्त चौक हा परिसर नेहमी लोकांच्या गर्दीने फुलून राहतो. आज मात्र या भागांमध्ये शुकशुकाट आहे. यवतमाळबरोबर दारव्हा, दिग्रस, नेर, उमरखेड, पुसद, वणी, आर्णी, पांढरकवडा आदी तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेची कर्फ्युला साथ मिळत आहे. बोटावर मोजण्याइतकेच लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येत आहेत.
रोज सकाळी प्रभात फेरीसाठी शेकडो नागरिकांची गर्दी रस्त्यावर असते. आज मात्र रस्ते सकाळपासून सामसूम आहेत. बाहेर रस्त्यावर देखील हीच परिस्थिती आहे. नागरिक स्वयंस्फूर्तीने घरात राहून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी साथ देत आहेत. दुकाने देखील सकाळपासून बंद आहेत.
यवतमाळ यासह जिल्ह्यात 9 आगार असून या सर्व ठिकाणच्या बस फेऱ्या पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या आहेत. एकट्या यवतमाळ बसस्थानकवरून दररोज जवळपास 18 ते 20 हजार प्रवाशी प्रवास करतात. तर जिल्ह्यात 60 हजात प्रवाशी जिल्ह्याअंतर्गत व लांब पल्याच्या वाहनातून प्रवास करतात. मात्र, आज जनता कर्फ्युमुळे ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जिल्हा वासियांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा बंद स्वयंस्फूर्तीने पाळला आहे.
Last Updated : Mar 22, 2020, 2:25 PM IST