Amravati Internet Service : सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत - इंटरनेट सेवा
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर (Amravati violence) शहरातील इंटरनेट सेवा (Amravati Internet Service) बंद करण्यात आली होती. परंतु काल (शुक्रवारी) दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शहरातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचार पूर्वी मोबाइलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानंतर अमरावती शहर पोलिसांनी शहरातील इंटरनेट सेवाही बंद केली होती. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, अनेक नोकरदारांना व व्यापाऱ्यांना आपल्या कामासाठी इंटरनेटच्या शोधात शहराबाहेर पडावे लागत होते. दरम्यान शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्यानंतर अनेकांनी सुटेकेचा निश्वास घेतला आहे.