VIDEO : गोदावरी नदीच्या पुरात युवकांची जीवघेणी स्टंटबाजी - Youth stunt Nashik Ramkund
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे पंचवटी परीसरातील बरीच मंदिरे पाण्याखाली गेली असून नदीकाठी राहणारे काही युवक पुराच्या पाण्यात उड्या घेत जीवघेणे स्टंट करत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे, त्यामुळे नाशकातील रामकुंडावर नदी दुथडी भरून वाहत आहे. रामकुंडावर पोहणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी काही तरुण उंचावरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी करत आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अशा जीवघेण्या स्टंट करणाऱ्या युवकांना हटकण्याचे काम स्थानिक पोलीस करत आहे.