आयपीएलचे भवितव्य 'ठाकरे' सरकारच्या हाती; बुधवारी होणार कॅबिनेट बैठक - corona ipl match
🎬 Watch Now: Feature Video

कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी उद्या (बुधवारी) मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक होणार असून, आयपीएलसह राज्यातील इतर गर्दीचे कार्यक्रम रद्द करायचे की नाही, यावर चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सरकार कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून, यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच बुधवारपासून व्यापक पद्धतीने जनजागृती करण्यात येणार आहे. पोस्टर, वर्तमानपत्र, वृत्त वहिनी, चित्रपटगृहांमध्ये जनजागृती करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
Last Updated : Mar 10, 2020, 11:18 PM IST