लसीकरणाचा पुढील टप्पा नियोजनबद्ध व्हावा - डॉ. भोंडवे - लसीकरण 18 वर्षावरील
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्र सरकारने 18 वर्षावरील व्यक्तीला सरकसकट लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. कारण 18 ते 45 या वयोगटातील तरुणांना जास्तीत जास्त कोरोनाची बाधा होत आहे. मात्र, आता लस देता येणार असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो, मात्र जर लसीकरण आता राबवायचे असेल तर आधीच्या कोविन अॅपवरती असणारे रजिस्ट्रेशन बंद करून ते थेट लसीकरण केंद्रावर करण्यात यावे आणि लसीकरणाचा वेग वाढवायला हवा, असे मत आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. सध्या काही सरकारी लसीकरण केंद्र आणि काही खासगी हॉस्पिटल केंद्रावरच ही देण्यात येत आहे. त्यामुळे सरसकट खासगी दवाखान्यात ही लस देण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचेही भाेंडवे यांनी सांगितले आहे.