एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेबाबत मला काही माहित नाही - संजय राऊत - ED's action on Eknath Khadse's son-in-law
🎬 Watch Now: Feature Video
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना बुधवारी अटक केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुंबई येथे बुधवारी विचारणा केली. यावेळी ते असे म्हणाले की, ईडीने केलेल्या या चौकशीबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. अशा कारवाया चालूच असतात. असे राऊत यांनी माध्यमांना सांगितले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताची तीन कृषी विधेयक -
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, येथील समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तीन कृषी विधेयक आणली आहेत ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभेत त्याला मंजुरी मिळाली आहे.