Bulli Bai App Case : महाराष्ट्र पोलिसांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय - गृहमंत्री - राज्याच्या पोलिसांची चांगली कामगिरी
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - 'बुली बाई' प्रकरण राज्यात घडले नाही. सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा होती. मात्र या प्रकरणात राज्याच्या पोलिसांनी चांगली कामगिरी केली असल्याचे गृहमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर उठलेल्या वादावरून या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करून कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी शोध लावून राज्याच्या बाहेरून आरोपींना अटक केली. पोलिसांनी केलेली ही कारवाई गर्व करण्यासारखे असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. मुंबईतील मालाड येथे असलेल्या क्रीडांगणला टिपू सुलतान हे नाव दिलाचा सध्या वाद सुरू आहे. मात्र समाजात वाद किंवा तिढा निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करू नये, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
TAGGED:
Bulli Bai App Case