पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस - पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी चिंचवड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच ढग दाटून आले होते. हलक्या सरी ही कोसळत होत्या. परंतू दुपारनंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळीच्या सुमारास पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) सकाळी पासूनच ढग दाटून आले होते. दुपारीच्या सुमारास अचानक पावसाने ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारादेखील होता. ३० मिनिट बरसलेल्या पावसाने नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली आहे.